पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उष्माघात टाळण्यासाठी वेळीच काळजी घ्या : जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आवाहन

इमेज
  पालघर : सध्या पालघर जिल्ह्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून रणरणत्या उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघातापासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी केले आहे. तापमानात वाढ झाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. उष्माघात झाल्यास ताप येणे, डोळ्यांत जळजळ होणे, अतितहान लागणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, अतिघाम येणे, मळमळ, उलट्या, घबराट, तीव्र थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये त्वचा निळसर पडणे, शरीराचे तापमान अचानक कमी होणे तसेच रक्तदाब व नाडीचे ठोके मंदावणे अशी लक्षणेही आढळू शकतात, असे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले. उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी हलक्या रंगाचे, विशेषतः पांढरे कपडे परिधान करावेत आणि काळ्या रंगाचे कपडे शक्यतो टाळावेत. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात श्रमाची कामे टाळावीत. बाहेर पडताना डोक्यावर टोपी, स्कार्फ किंवा रुमाल वापरावा. दुचाकीवर प्रवास करताना हेल्मेटसोबत डोक्याचे योग्य संरक्षण करणे ...