पोस्ट्स

रासरंग दांडिया उत्सव 2026ची रंगत वाढणार; युवा फाउंडेशनचा सर्वांसाठी मोफत गरबा; मराठी कलाकार लावणार हजेरी

इमेज
  बोईसर : नवरात्रोत्सवाच्या उत्साहाला सामाजिक बांधिलकीची जोड देत युवा फाउंडेशन, बोईसरच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या ‘रासरंग दांडिया उत्सव 2026 ची माहिती देण्यासाठी सरोवर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांनाही गरब्याचा आनंद घेता यावा, या उद्देशाने मोफत रासरंग गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या पत्रकार परिषदेला कार्यक्रमाचे अध्यक्ष तुषार संखे, कार्याध्यक्ष मुकेश पाटील यांच्यासह भरत राजपूत, वसंत चव्हाण, संतोष मराठे, प्रशांत संखे, चंदन शिंग, वैदेही वाढण, चांदणे, सुशील चूरी, अंकुर राऊळ, संदीप घरत, प्रितेश संखे, महेंद्र भोणे, चिराग राणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सविस्तर माहिती रुपेश (सौरभ आप्पा) यांनी दिली. यावेळी वसंत चव्हाण यांनी ‘रासरंग’ गरबा उत्सवामागील संकल्पना आणि आयोजनाबाबत माहिती दिली. तर संतोष मराठे यांनी सर्वसामान्यांसाठी मोफत रासरंग गरबा आयोजित केल्याबद्दल युवा फाउंडेशनचे कौतुक केले. आजवर अनेक ठिकाणी गरबा उत्सव होत असले तरी सर्वांसाठी विनामूल्य गरब्याचे आयोजन करण्याचा हा उपक्रम विशेष असल्याचे त्यांनी न...

नफ्यासाठी नाही, सामाजिक सलोख्यासाठी! नवरंग फाउंडेशनतर्फे भव्य इनडोअर गरबा महोत्सवाचे आयोजन

इमेज
बोईसर/प्रतिनिधी : नवरंग फाउंडेशन (बोईसर) यांच्या वतीने आगामी नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केल्या जाणार्‍या गरबा महोत्सवासंदर्भात आज एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेस संस्थेचे प्रमुख पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना संयोजकांनी सांगितले की, हा महोत्सव कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून, सर्व पक्षांतील प्रमुख नेते आणि कार्यकर्ते एकत्र येऊन गरबाप्रेमींसाठी हे सुरक्षित व भव्य व्यासपीठ निर्माण करत आहेत. सर्वपक्षीय ऐक्याच्या माध्यमातून बोईसर परिसरातील नागरिकांना उच्च दर्जाचा सांस्कृतिक उत्सव उपलब्ध करून देणे हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिला सुरक्षा आणि पार्किंग व्यवस्था: या महोत्सवात महिला व युवतींची उपस्थिती लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार असून कोणालाही कोणताही त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाईल. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येणार्‍या वाहनांकरिता प्रशस्त आणि सुरक्षित पार्किंगची स...

महाराष्ट्राप्रमाणे केंद्रातही ३३ जातींना मिळावे ओबीसी आरक्षण, अन्यथा आगामी निवडणुकीत भोगावे लागतील गंभीर परिणाम: श्रावण फरकाडे यांचा इशारा!

इमेज
  उरण : महाराष्ट्र राज्यात ३३ जातींना ओबीसी (इतर मागासवर्गीय) आरक्षण लागू आहे; मात्र याच ३३ जातींना केंद्र स्तरावर हे आरक्षण मिळत नाही. यामुळे केंद्रीय यादीतून वंचित राहिलेल्या या ३३ जातींचे मोठे आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून 'ओबीसी महाराष्ट्र कृती समिती'च्या माध्यमातून या ३३ जातींना महाराष्ट्र राज्याच्या धर्तीवर केंद्र सरकारकडूनही ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी कायदेशीर आणि शांततापूर्ण मार्गाने सातत्याने लढा सुरू आहे. शासन-प्रशासनाशी सातत्याने पत्रव्यवहार केला जात असून सर्वपक्षीय मंत्री, खासदार आणि आमदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीही घेण्यात आल्या आहेत. परंतु, दीर्घकाळापासून ही गंभीर समस्या सुटली नसल्यामुळे आता हा लढा निर्णायक वळणावर पोहोचला आहे. ओबीसी महाराष्ट्र कृती समितीच्या मागण्या मान्य न झाल्यास आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तीव्र आंदोलन छेडले जाईल, ज्याच्या परिणामांना शासन पूर्णपणे जबाबदार राहील, असा आक्रमक इशारा ओबीसी महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष श्रावण फरकाडे यांनी उरण येथे आयोजित सभेत दिला. महाराष्ट्रातील...

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त बोईसरमध्ये रक्तदान व आरोग्य शिबिर संपन्न! संजय पाटील यांच्या पुढाकारातून समाजसेवेचा आदर्श

इमेज
बोईसर : महाराष्ट्राचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ हार-तुरे अथवा औपचारिक स्वागतावर भर न देता, थेट जनसेवेचा वसा जपणारा स्तुत्य उपक्रम बोईसर येथे पार पडला. स्थानिक डॉन बॉस्को शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराला कामगार, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीची साडेतीन दशकांची परंपरा अधिक दृढ केली. शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या उपक्रमात विविध क्षेत्रांतील घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विशेषतः स्थानिक कामगार संघटना, रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तसंकलन झाले. आपत्कालीन परिस्थिती आणि शस्त्रक्रियांच्या वेळी रक्तपेढ्यांमधील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी हे शिबिर अत्यंत दिलासादायक ठरले आहे. यापूर्वी जागतिक महामारीच्या अत्यंत कठीण काळातही अविरत शिबिरे राबवून गरजूंना जीवनदान देण्याचे काम या फळीने केल...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)च्या पालघर जिल्हा महासचिव व मीडिया प्रमुखपदी निनाद घरत; कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण!

इमेज
पालघर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)च्या पालघर जिल्हा महासचिव तसेच मीडिया प्रमुखपदी बोईसर येथील ज्येष्ठ पत्रकार निनाद घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आनंद ठाकूर यांच्या माध्यमातून, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संमतीने निनाद घरत यांची ही नियुक्ती करण्यात आली. पालघर येथील पक्ष कार्यालयात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी तसेच पक्षाची भूमिका आणि विविध उपक्रम प्रभावीपणे माध्यमांपर्यंत पोहोचविण्यासाठी निनाद घरत महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला. नियुक्तीनंतर माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना नवनियुक्त जिल्हा महासचिव व मीडिया प्रमुख निनाद घरत यांनी पक्षाने सोपविलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे प...

क्षाबंधन स्नेहबंधन सोहळा; इनर व्हील क्लब ऑफ पालघरचा प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचा उपक्रम

इमेज
सफाळे : इनर व्हील क्लब ऑफ पालघरच्या वतीने सफाळे येथील सपोर्ट रिहॅबिलिटेशन सेंटर येथे रक्षाबंधन स्नेहबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. केंद्रातील कुटुंबापासून दूर राहणाऱ्या १५ विशेष मुलांसोबत रक्षाबंधनाचा सण प्रेमळ आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. रक्षाबंधन हा प्रेम, आपुलकी, काळजी आणि नात्यांची जपणूक करणारा सण आहे. या विशेष मुलांना कुटुंबापासून दूर असल्याची भावना जाणवू नये आणि त्यांना प्रेम, माया व आपलेपणाची ऊब मिळावी, या उद्देशाने क्लबच्या सदस्यांनी मुलांसोबत वेळ घालवला. यावेळी काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. सलग दुसऱ्या वर्षी इनर व्हील क्लब ऑफ पालघरने रक्षाबंधन साजरे केल्याबद्दल समाधान आणि आनंद सपोर्ट रिहॅबिलिटेशन सेंटरचे प्रमुख श्री. विजय पवार यांनी व्यक्त केला. या उपक्रमाची व्याप्ती केवळ एका दिवसाच्या आनंदापुरती मर्यादित न ठेवता, केंद्रातील मुलांच्या दैनंदिन गरजांचा विचार करण्यात आला. क्लबच्या वतीने केंद्रासाठी दोन महिन्यांसाठी आवश्यक असणारे किराणा साहित्य देण्यात आले. या योगदानामुळे केंद्राच्या दैनंदिन व्यवस्थापनाला मोलाचा हातभार लागला. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंद...

बोईसरमध्ये शिवशंभु चालक-मालक संघटनेचा दिमाखात शुभारंभ

इमेज
पालघर : भारतीय जनता पक्ष प्रणित शिवशंभु ऑटो-रिक्षा, टॅक्सी व टेम्पो चालक-मालक संघटना, बोईसरचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पालघरचे खासदार हेमंत विष्णू सावरा आणि भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या शुभहस्ते संघटनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने ऑटो-रिक्षा, टॅक्सी व टेम्पो चालक-मालक उपस्थित होते. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हा महासचिव तथा संघटनेचे संस्थापक अशोक वडे, ज्येष्ठ नेते बाबाजी काठोले, जिल्हा उपाध्यक्ष तथा डहाणू उपनगराध्यक्ष जगदीश राजपूत, अनुसूचित जमाती ठाणे-पालघर जिल्हा सचिव प्रकाश निकम, जिल्हा सचिव सत्यप्रकाश सिंह, विवेक वडे, बोईसर मंडळ अध्यक्ष महेंद्र भोने, बोईसर युवा मंडळ अध्यक्ष आनंद धोडी, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष आर. बी. सिंह, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष अहमद खान, विधी आघाडी जिल्हाध्यक्ष शानू ठाकूर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शुभम वडे, राहुल सिंह, प्रमोद कोठेकर, पंचायत समिती सदस्या सलोनीताई संखे, माजी व्यापार मोर्चा जिल्हाध्यक्ष दुर्गेश सोलंकी यांच्यास...