कोळगाव ग्रामसचिवालय इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न!
कोळगाव: येथील ग्रामपंचायतीच्या नूतन ग्रामसचिवालय इमारतीचे लोकार्पण पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या सोहळ्यास पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि उपनेत्या ज्योती मेहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमातील उपस्थिती: यावेळी लोकनियुक्त सरपंच कुणाल चंद्रकांत पाटील, उपसरपंच किरण संखे, ग्रामपंचायत अधिकारी जितेंद्र पवार तसेच विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध उपक्रम आणि वाटप: लोकार्पण सोहळ्यानिमित्त ग्रामपंचायतीमार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात नेत्र तपासणी, वजन, रक्तगट व इतर चाचण्या करण्यात आल्या. तसेच सुमारे ४०० महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करून साड्यांचे वाटप करण्यात आले. कांदळवन समितीअंतर्गत २७ महिला बचत गटांना विविध साहित्याचे वाटपही यावेळी करण्यात आले. सामाजिक बांधिलकी आणि घोषणा: सरपंच कुणाल पाटील यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त नेत्रदान नोंदणी ...