पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

क्षाबंधन स्नेहबंधन सोहळा; इनर व्हील क्लब ऑफ पालघरचा प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचा उपक्रम

इमेज
सफाळे : इनर व्हील क्लब ऑफ पालघरच्या वतीने सफाळे येथील सपोर्ट रिहॅबिलिटेशन सेंटर येथे रक्षाबंधन स्नेहबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. केंद्रातील कुटुंबापासून दूर राहणाऱ्या १५ विशेष मुलांसोबत रक्षाबंधनाचा सण प्रेमळ आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. रक्षाबंधन हा प्रेम, आपुलकी, काळजी आणि नात्यांची जपणूक करणारा सण आहे. या विशेष मुलांना कुटुंबापासून दूर असल्याची भावना जाणवू नये आणि त्यांना प्रेम, माया व आपलेपणाची ऊब मिळावी, या उद्देशाने क्लबच्या सदस्यांनी मुलांसोबत वेळ घालवला. यावेळी काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. सलग दुसऱ्या वर्षी इनर व्हील क्लब ऑफ पालघरने रक्षाबंधन साजरे केल्याबद्दल समाधान आणि आनंद सपोर्ट रिहॅबिलिटेशन सेंटरचे प्रमुख श्री. विजय पवार यांनी व्यक्त केला. या उपक्रमाची व्याप्ती केवळ एका दिवसाच्या आनंदापुरती मर्यादित न ठेवता, केंद्रातील मुलांच्या दैनंदिन गरजांचा विचार करण्यात आला. क्लबच्या वतीने केंद्रासाठी दोन महिन्यांसाठी आवश्यक असणारे किराणा साहित्य देण्यात आले. या योगदानामुळे केंद्राच्या दैनंदिन व्यवस्थापनाला मोलाचा हातभार लागला. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंद...

बोईसरमध्ये शिवशंभु चालक-मालक संघटनेचा दिमाखात शुभारंभ

इमेज
पालघर : भारतीय जनता पक्ष प्रणित शिवशंभु ऑटो-रिक्षा, टॅक्सी व टेम्पो चालक-मालक संघटना, बोईसरचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पालघरचे खासदार हेमंत विष्णू सावरा आणि भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या शुभहस्ते संघटनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने ऑटो-रिक्षा, टॅक्सी व टेम्पो चालक-मालक उपस्थित होते. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हा महासचिव तथा संघटनेचे संस्थापक अशोक वडे, ज्येष्ठ नेते बाबाजी काठोले, जिल्हा उपाध्यक्ष तथा डहाणू उपनगराध्यक्ष जगदीश राजपूत, अनुसूचित जमाती ठाणे-पालघर जिल्हा सचिव प्रकाश निकम, जिल्हा सचिव सत्यप्रकाश सिंह, विवेक वडे, बोईसर मंडळ अध्यक्ष महेंद्र भोने, बोईसर युवा मंडळ अध्यक्ष आनंद धोडी, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष आर. बी. सिंह, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष अहमद खान, विधी आघाडी जिल्हाध्यक्ष शानू ठाकूर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शुभम वडे, राहुल सिंह, प्रमोद कोठेकर, पंचायत समिती सदस्या सलोनीताई संखे, माजी व्यापार मोर्चा जिल्हाध्यक्ष दुर्गेश सोलंकी यांच्यास...

राष्ट्रभक्तीच्या रंगात रंगली ‘एक शाम, देश के नाम’; विराज इंटरनॅशनल स्कूलमध्ये देशभक्तीपर सादरीकरणांनी रंगली संध्या

इमेज
  बोईसर (प्रतिनिधी) : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विराज इंटरनॅशनल स्कूल, कुरगाव-बोईसर येथे १५ ऑगस्टच्या संध्याकाळी ‘एक शाम, देश के नाम’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रभक्ती, भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेने ओतप्रोत भरलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी गीत, संगीत, नृत्य, कविता आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांच्या माध्यमातून देशाचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढा तसेच स्वातंत्र्य सैनिकांचे त्याग व बलिदान प्रभावीपणे मांडले. विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नीरज राजा कोचर आणि रेणु कोचर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा प्रमुख पाहुणे, तर पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थी व शिक्षकांच्या सादरीकरणांचे कौतुक करत, अशा कार्यक्रमांमुळे नव्या पिढीला देशाचा इतिहास, भारतीय संस्कृती आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाशी जोडण्यास मोठी मदत होते, असे सांगितले. यावेळी विराज उद्योग समूहाचे हरीश आहुजा (कॉर्पो...

बोईसरच्या विराज इंटरनॅशनल स्कूलमध्ये बी. के. शिवानी यांचे "मूल्याधारित नेतृत्व" विषयावर प्रेरणादायी व्याख्यान; "तंत्रज्ञान नव्हे, मानवी मूल्येच भविष्य बदलतील!" – बी. के. शिवानी

इमेज
बोईसर   :  तारापूर रोड येथील विराज इंटरनॅशनल स्कूलमध्ये “इंद्रधनुष कार्यक्रमा”चा एक भाग म्हणून एका विशेष आध्यात्मिक सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रख्यात आध्यात्मिक मार्गदर्शक आणि प्रेरक वक्त्या बी. के. शिवानी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. “शाश्वत भविष्यासाठी मूल्याधारित नेतृत्व” या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी नैतिक आणि मानवी मूल्यांवर विशेष भर दिला. आपल्या शांत आणि अभ्यासपूर्ण भाषणात बी. के. शिवानी म्हणाल्या की, केवल आधुनिक तंत्रज्ञान, संसाधने किंवा आर्थिक विकासाच्या जोरावर समृद्ध भविष्य घडवता येणार नाही; तर तंत्रज्ञान नव्हे, तर मानवी मूल्येच भविष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील. त्यासाठी मूल्यांवर आधारित नेतृत्व अत्यावश्यक आहे. त्या पुढे म्हणाल्या, “खरा नेता तोच असतो, जो आपल्या विचारांत, वर्तनात आणि निर्णयांमध्ये सचोटी, करुणा, आत्मशिस्त आणि जबाबदारीला प्राधान्य देतो.” नेतृत्व म्हणजे केवळ ध्येय गाठणे नव्हे: आजच्या स्पर्धात्मक जगाचा संदर्भ देत बी. के. शिवानी यांनी स्पष्ट केले की, नेतृत्व म्हणजे केवळ ठरवलेली...