बोईसरमध्ये शिवशंभु चालक-मालक संघटनेचा दिमाखात शुभारंभ


पालघर : भारतीय जनता पक्ष प्रणित शिवशंभु ऑटो-रिक्षा, टॅक्सी व टेम्पो चालक-मालक संघटना, बोईसरचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पालघरचे खासदार हेमंत विष्णू सावरा आणि भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या शुभहस्ते संघटनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने ऑटो-रिक्षा, टॅक्सी व टेम्पो चालक-मालक उपस्थित होते.

या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हा महासचिव तथा संघटनेचे संस्थापक अशोक वडे, ज्येष्ठ नेते बाबाजी काठोले, जिल्हा उपाध्यक्ष तथा डहाणू उपनगराध्यक्ष जगदीश राजपूत, अनुसूचित जमाती ठाणे-पालघर जिल्हा सचिव प्रकाश निकम, जिल्हा सचिव सत्यप्रकाश सिंह, विवेक वडे, बोईसर मंडळ अध्यक्ष महेंद्र भोने, बोईसर युवा मंडळ अध्यक्ष आनंद धोडी, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष आर. बी. सिंह, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष अहमद खान, विधी आघाडी जिल्हाध्यक्ष शानू ठाकूर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शुभम वडे, राहुल सिंह, प्रमोद कोठेकर, पंचायत समिती सदस्या सलोनीताई संखे, माजी व्यापार मोर्चा जिल्हाध्यक्ष दुर्गेश सोलंकी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच संघटनेचे महासचिव अधिवक्ता विपीन पाटील, सल्लागार रुपेशजी संखे, तुषारभाई साबू, वैभव सिंह, अध्यक्ष अखिलेश सिंह, कार्याध्यक्ष रामचंद्र खोत, उपाध्यक्ष आनंदराज शेळके, सचिव प्रवेश सिंह आणि कोषाध्यक्ष संजय राऊळ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उद्घाटन सोहळ्यादरम्यान संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संस्थापक अशोक वडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. चालक-मालक वर्गाच्या विविध समस्या, अडचणी आणि हक्कांच्या प्रश्नांसाठी संघटना संघटितपणे कार्य करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. चालक-मालकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये तसेच त्यांच्या समस्या योग्य व्यासपीठावर मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ऑटो-रिक्षा, टॅक्सी व टेम्पो चालक-मालक वर्ग हा शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रवास व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे या वर्गाच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून देणे, त्यांच्या मागण्या संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचविणे आणि गरजेच्या वेळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट राहणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

उद्घाटन सोहळ्यात खासदार हेमंत विष्णू सावरा आणि जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना शुभेच्छा दिल्या. चालक-मालक वर्गासमोर निर्माण होणाऱ्या विविध समस्या व अडचणींच्या काळात संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांना योग्य प्रकारे वाचा फोडली जाईल, तसेच आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच चालक-मालकांच्या हितासाठी परस्पर समन्वयाने कार्य करण्यावर भर दिला. बोईसर परिसरातील चालक-मालकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या प्रश्नांना संघटितपणे मांडण्याची भूमिका संघटना पार पाडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल संघटनेच्या वतीने रेल्वे प्रशासनाचे विशेष आभार मानण्यात आले. विविध स्तरांतून मिळालेल्या सहकार्यामुळे उद्घाटन सोहळा नियोजनबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले.

शिवशंभु ऑटो-रिक्षा, टॅक्सी व टेम्पो चालक-मालक संघटनेच्या शुभारंभामुळे बोईसर परिसरातील चालक-मालकांच्या समस्या संघटितपणे मांडण्यासाठी तसेच त्यांच्या हक्क व हितासाठी कार्य करण्याच्या दिशेने एका नव्या संघटनात्मक पर्वाची सुरुवात झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोळगाव ग्रामसचिवालय इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न!

पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने फुलाचा पाडा शाळेत शालेय साहित्य वाटप, कपाट भेट व वृक्षारोपण संपन्न!