पोस्ट्स

जून, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रोटरी क्लब ऑफ पालघरतर्फे 'नो हॉर्न प्लीज' उपक्रमाचा शानदार प्रारंभ; रिक्षांवर लावणार ३५० स्टिकर्स

इमेज
    पालघर : समाजात वाढत्या ध्वनी प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पालघरच्या वतीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. बुधवार, दिनांक १७ जून २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता ध्वनी प्रदूषण जनजागृती अभियानांतर्गत "NO HORNS PLEASE – कृपया हॉर्न वाजवू नये" या विशेष उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या अभियानाचा मुख्य उद्देश शहरातील अनावश्यक हॉर्न वाजवण्याच्या सवयीला आळा घालणे आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण करणे हा आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पीपी ॲडव्होकेट रोटेरियन जयेशजी आव्हाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच शहरातील रिक्षाचालकांना या मोहिमेत सामील करून घेण्यासाठी रिक्षा युनियनचे लीडर श्री. मनोज घरत व श्री. सुनील दांडेकर यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या या सक्रिय सहभागामुळेच हा जनजागृती कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाला. या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील तब्बल ३५० रिक्षांवर "NO HORNS PLEASE" (कृपया हॉर्न वाजवू नये) असे संदेश देणारे स्टिकर्स लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रिक्षांच्या माध्यमात...