पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाढवण बंदरासाठी ७६ हजार २२० कोटींची मंजुरी; ८ लेन महामार्गासह कनेक्टिव्हिटीला गती

इमेज
पालघर, दि. १० : देशाच्या लॉजिस्टिक क्षेत्राला नवी झेप देणाऱ्या वाढवण बंदर प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मोठी चालना मिळाली असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल ७६,२२० कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी यांच्याकडे सागरमाला कार्यक्रमांतर्गत या बंदराच्या विकासाची धुरा सोपवण्यात आली आहे. प्रस्तावित वाढवण बंदराला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वाहतूक नेटवर्कशी जोडण्यासाठी नॅशनल हायवे  अथॉरिटी ऑफ इंडिया  पुढाकार घेत असून, NH-48 व दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे (NE-4) यांच्याशी सुसज्ज रस्ते संपर्क उभारण्यात येणार आहे. सध्या प्रकल्प परिसरातील दोन लेनचे रस्ते मर्यादित क्षमतेचे असून वस्ती भागातून जात असल्याने वाहतुकीवर मोठा ताण आहे. या पार्श्वभूमीवर एनएचएआयने NH-248S मार्गावर ४ लेन (भविष्यात ८ लेनपर्यंत विस्तारयोग्य) नियंत्रित प्रवेश असलेला आधुनिक महामार्ग उभारण्याचे नियोजन केले आहे. हा महामार्ग वाढवण बंदराला NH-48 वरील तवा गावाशी थेट जोडणार असून, यामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा अपेक्षित आहे. दरम्यान, पर्यावरणीय दृष्टीनेही प्रकल्पाला आवश्यक मंजुरी मिळाली आहे. Min...

बोईसरमध्ये विराज कंपनीची जनसुनावणी संमिश्र वातावरणात पार!

इमेज
  पालघर | प्रतिनिधी : बोईसर परिसरातील विराज स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पासंदर्भातील जनसुनावणी बुधवारी (दि. ०८ एप्रिल २०२६) संमिश्र वातावरणात पार पडली. या सुनावणीत विविध मुद्द्यांवर सखोल आणि सकारात्मक चर्चा झाली असून प्रकल्पाबाबत समर्थन आणि विरोध अशा दोन्ही भूमिका स्पष्टपणे समोर आल्या. सुनावणीदरम्यान काही ग्रामस्थांनी प्रकल्पावर चर्चा होण्यापूर्वी संबंधित गावांमध्ये ग्रामसभांद्वारे पूर्वचर्चा व्हावी, अशी मागणी केली. तसेच सुनावणीचे ठिकाण सर्वांना सोयीस्कर नसल्याची भावना व्यक्त करत पर्यायी ठिकाणाची व्यवस्था करण्याची सूचनाही करण्यात आली. पर्यावरणाच्या दृष्टीनेही काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. विशेषतः नदी व नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी कंपनीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची सखोल तपासणी व्हावी, असेही मत मांडण्यात आले. दुसरीकडे, या प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास काही उपस्थितांनी व्यक्त केला. औद्...

पालघरमध्ये औद्योगिक क्रांतीची नवी लाट : विराज प्रोफाइल्सच्या विस्तारामुळे ५००० हून अधिक रोजगारांची निर्मिती होणार - जे.पी.गर्ग, महाप्रबंधक, विराज प्रोफाईल्स प्रा.लि. तारापुर

इमेज
पालघर : महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात औद्योगिक विकास आणि सामाजिक उत्थानाला नवी उंची देण्याच्या उद्देशाने विराज प्रोफाइल्स प्रा. लि. ने आपल्या विस्तार योजनेची घोषणा केली आहे. कंपनीने मान आणि वरानगडे गावांमध्ये स्टेनलेस स्टील HRAP/CRAP शीट्स, प्लेट्स आणि कॉइल्स उत्पादनांचे नियमितीकरण आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी एक व्यापक प्रकल्प प्रस्तावित केला आहे. या धोरणात्मक उपक्रमाची समीक्षा करण्यासाठी आणि स्थानिक रहिवाशांच्या सूचना व हरकती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे (MPCB) आगामी ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, एसआरएम प्लांट, ग्राम मान येथे एका सार्वजनिक जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. कंपनीने दावा केला आहे की, विराज प्रोफाइल्स गेल्या ३० वर्षांपासून बोईसरच्या आर्थिक विकासाचा आधारस्तंभ राहिली असून, सध्या १३,००० हून अधिक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देत आहे. या नवीन प्रकल्पामुळे क्षेत्राची औद्योगिक क्षमता तर वाढेलच, शिवाय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ५,००० हून अधिक लोकांसाठी रोजगाराची नवीन दारे उघडतील. ​कंपनीचा हा विस्तार केवळ व्यवसायापुरता मर्या...