पोस्ट्स

सप्टेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त बोईसरमध्ये रक्तदान व आरोग्य शिबिर संपन्न! संजय पाटील यांच्या पुढाकारातून समाजसेवेचा आदर्श

इमेज
बोईसर : महाराष्ट्राचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ हार-तुरे अथवा औपचारिक स्वागतावर भर न देता, थेट जनसेवेचा वसा जपणारा स्तुत्य उपक्रम बोईसर येथे पार पडला. स्थानिक डॉन बॉस्को शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराला कामगार, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीची साडेतीन दशकांची परंपरा अधिक दृढ केली. शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या उपक्रमात विविध क्षेत्रांतील घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विशेषतः स्थानिक कामगार संघटना, रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तसंकलन झाले. आपत्कालीन परिस्थिती आणि शस्त्रक्रियांच्या वेळी रक्तपेढ्यांमधील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी हे शिबिर अत्यंत दिलासादायक ठरले आहे. यापूर्वी जागतिक महामारीच्या अत्यंत कठीण काळातही अविरत शिबिरे राबवून गरजूंना जीवनदान देण्याचे काम या फळीने केल...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)च्या पालघर जिल्हा महासचिव व मीडिया प्रमुखपदी निनाद घरत; कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण!

इमेज
पालघर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)च्या पालघर जिल्हा महासचिव तसेच मीडिया प्रमुखपदी बोईसर येथील ज्येष्ठ पत्रकार निनाद घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आनंद ठाकूर यांच्या माध्यमातून, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संमतीने निनाद घरत यांची ही नियुक्ती करण्यात आली. पालघर येथील पक्ष कार्यालयात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी तसेच पक्षाची भूमिका आणि विविध उपक्रम प्रभावीपणे माध्यमांपर्यंत पोहोचविण्यासाठी निनाद घरत महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला. नियुक्तीनंतर माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना नवनियुक्त जिल्हा महासचिव व मीडिया प्रमुख निनाद घरत यांनी पक्षाने सोपविलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे प...