राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)च्या पालघर जिल्हा महासचिव व मीडिया प्रमुखपदी निनाद घरत; कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण!


पालघर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)च्या पालघर जिल्हा महासचिव तसेच मीडिया प्रमुखपदी बोईसर येथील ज्येष्ठ पत्रकार निनाद घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आनंद ठाकूर यांच्या माध्यमातून, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संमतीने निनाद घरत यांची ही नियुक्ती करण्यात आली. पालघर येथील पक्ष कार्यालयात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी तसेच पक्षाची भूमिका आणि विविध उपक्रम प्रभावीपणे माध्यमांपर्यंत पोहोचविण्यासाठी निनाद घरत महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

नियुक्तीनंतर माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना नवनियुक्त जिल्हा महासचिव व मीडिया प्रमुख निनाद घरत यांनी पक्षाने सोपविलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा जनाधार वाढत असल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत असून, नव्या नियुक्तीमुळे संघटनात्मक कामाला आणखी बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बोईसरमध्ये शिवशंभु चालक-मालक संघटनेचा दिमाखात शुभारंभ

कोळगाव ग्रामसचिवालय इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न!

पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने फुलाचा पाडा शाळेत शालेय साहित्य वाटप, कपाट भेट व वृक्षारोपण संपन्न!