पोस्ट्स

जुलै, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

केंद्रीय ओबीसी यादीत ३३ जातींसह सलमानी समाजाचा समावेश करावा; ओबीसी महाराष्ट्र कृती समितीची दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे मागणी

इमेज
  नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राज्याच्या ओबीसी यादीत समाविष्ट असलेल्या, मात्र अद्याप केंद्रीय ओबीसी यादीत समावेश न झालेल्या ३३ जातींना न्याय मिळावा, या मागणीसाठी ओबीसी महाराष्ट्र कृती समितीचे ३३ जातींचे प्रतिनिधी २९ जुलै २०२६ पासून नवी दिल्ली येथे दाखल झाले आहेत. यासंदर्भातील केंद्रीय अधिसूचना तातडीने जाहीर करावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. महाराष्ट्र शासनाने ८ ऑक्टोबर २०२४ व २ नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या (NCBC) सकारात्मक शिफारशींसह हे प्रस्ताव सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाकडे पाठविले आहेत. मात्र, अद्याप केंद्रीय अधिसूचना प्रसिद्ध न झाल्याने लाखो ओबीसी विद्यार्थ्यांना व युवकांना केंद्र शासनाच्या आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. दिल्लीतील पहिल्याच दिवशी शिष्टमंडळाने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, बी. एल. वर्मा, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, लोकसभा ओबीसी कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश सिंह, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सदस्या किरण महाले, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच खासदार हेमंत विष्णू सावर...

वृक्षारोपण व अग्निशमन प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती; पांजरे जि. प. शाळेत बोईसर-पालघर पत्रकार संघातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, छत्र्या व घड्याळांचे वाटप!

इमेज
  पालघर (प्रतिनिधी) : बोईसर-पालघर पत्रकार संघ (रजि.) यांच्या वतीने बुधवार, दि. २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांजरे, केंद्र महागाव, जिल्हा पालघर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, छत्र्या व हातातील घड्याळांचे वितरण, वृक्षारोपण तसेच अग्निसुरक्षा जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि आपत्कालीन परिस्थितीतील सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, छत्र्या आणि हातातील घड्याळे मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. तसेच शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाला बळकटी मिळावी, या उद्देशाने विद्यालयाला प्रिंटर आणि भिंतीवरील घड्याळ भेट देण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी पालघरचे साहाय्यक कामगार आयुक्त दिनेश दाभाडे, सरकारी कामगार अधिकारी सचिन खलाणे, माजी पोलीस अधीक्षक के. एस. हेगाजे, राष्ट्रीय मानवाधिकार महिला व बालविकास आयोगा...

पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने फुलाचा पाडा शाळेत शालेय साहित्य वाटप, कपाट भेट व वृक्षारोपण संपन्न!

इमेज
बोईसर : पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्था, बोईसर यांच्या वतीने दिनांक १० जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषद शाळा फुलाचा पाडा, लालोंढे येथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि रेनकोट वाटप, शाळेला लोखंडी कपाट भेट तसेच वृक्षारोपण अशा विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे जल्लोषात स्वागत केले. सर्व मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यानंतर शाळेच्या मुख्य शिक्षिका सौ. अक्षता पाटील, त्यांच्या सहकारी शिक्षिका सौ. तृप्ती गावड व लालोंढे ग्रामपंचायतीच्या सदस्या तथा पालक प्रतिनिधी सौ. सृष्टी तांडेल यांनी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब साठे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यासोबतच उपस्थित इतर सर्व विश्वस्त, पदाधिकारी आणि सदस्यांचेही स्वागत करण्यात आले. संस्थेचे जनरल सेक्रेटरी राजेंद्र थोरात यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या प्रवासाचा आढावा घेतला. संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट २००१ रोजी झाली असून, ही संस्था गेली २५ वर्षे बोईसर व परिसरामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम सातत्या...