रासरंग दांडिया उत्सव 2026ची रंगत वाढणार; युवा फाउंडेशनचा सर्वांसाठी मोफत गरबा; मराठी कलाकार लावणार हजेरी
बोईसर : नवरात्रोत्सवाच्या उत्साहाला सामाजिक बांधिलकीची जोड देत युवा फाउंडेशन, बोईसरच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या ‘रासरंग दांडिया उत्सव 2026 ची माहिती देण्यासाठी सरोवर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांनाही गरब्याचा आनंद घेता यावा, या उद्देशाने मोफत रासरंग गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या पत्रकार परिषदेला कार्यक्रमाचे अध्यक्ष तुषार संखे, कार्याध्यक्ष मुकेश पाटील यांच्यासह भरत राजपूत, वसंत चव्हाण, संतोष मराठे, प्रशांत संखे, चंदन शिंग, वैदेही वाढण, चांदणे, सुशील चूरी, अंकुर राऊळ, संदीप घरत, प्रितेश संखे, महेंद्र भोणे, चिराग राणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सविस्तर माहिती रुपेश (सौरभ आप्पा) यांनी दिली. यावेळी वसंत चव्हाण यांनी ‘रासरंग’ गरबा उत्सवामागील संकल्पना आणि आयोजनाबाबत माहिती दिली. तर संतोष मराठे यांनी सर्वसामान्यांसाठी मोफत रासरंग गरबा आयोजित केल्याबद्दल युवा फाउंडेशनचे कौतुक केले. आजवर अनेक ठिकाणी गरबा उत्सव होत असले तरी सर्वांसाठी विनामूल्य गरब्याचे आयोजन करण्याचा हा उपक्रम विशेष असल्याचे त्यांनी न...